

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये भारतीय सैन्यासाठी शौर्याचा कारगिल विजय दिन म्हणून २६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा झेंडा फडकावला होता हा दिवस “कारगिल विजय दिवस” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची भावी पिढीला माहिती व्हावी म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये मध्ये कारगिल विजय दिवस साजरा केला .याप्रसंगी विद्यार्थ्यानी सैनिकांचे ड्रेस परिधान केले होते. सैनिकांचे ड्रेस घातलेले विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला मुलांना मार्गदर्शन शाळेच्या उपशिक्षिका करिश्मा वंजारी यांनी केले . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




