

जळगाव: येथील कुटुंबळे परिवाराच्या घरगुती गणेशोत्सव देखाव्यात यंदा महिला सक्षमीकरणाचे सादरीकरण करण्यात आले आहे. सागर कुटुंबळे व रोहित कुटुंबळे यांच्या निवासस्थानी गणपती उत्सवाचे मुळ ध्येय व वास्तविकता लक्षात घेऊन आजच्या युगात सक्षम स्त्री किती सबळ व सक्षम आहे. हिंदु धर्मात स्त्री देवीची विविध रुपे व त्या धार्मिकतेसोबत जाऊन विज्ञानाची कास धरत आजच्या स्त्रीला जे अपेक्षित यश आले आहे, त्याबाबत सचित्र सादरीकरण या देखाव्यात पाहण्यास मिळते.
चंद्रयान, नासा, आँपरेशन सिंदूर यामधील स्त्री सहभाग व जबाबदारी यावर देखाव्यात भर दिलेल्याचे दिसून येते. साक्षरता, सक्षमीकरण, सबळता या मुद्यांसह हुंडाबळी, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार यावर कवितेद्वारे प्रबोधन मनाला भारावून टाकणारे आहे. परिसरातील सर्व नागरिकांना व आप्तेष्टजनाना कुटुंबळे परिवाराने आमंत्रित केले आहे.




