जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय ,जळगाव येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅम होत्या . तसेच डॉ . प्रतिभा पाटील , डॉ. जयश्री पाटील सहा.प्रा.सुवर्णा अहिरे ,निधी शर्मा , श्री पंकज वाघ ,श्री चंद्रकांत सपकाळे तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच संविधानाच्या प्रतीला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .त्यानंतर सर्व उपस्थित आणि संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले . त्यानंतर डॉ . जयश्री पाटील यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून का साजरा केला जातो त्याचे थोडक्यात विवेचन केले .त्यानंतर डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी संविधानाविषयी थोडक्यात माहिती सांगितली कार्यक्रमाच्या शेवटी डॉ . अनिता वानखेडे यांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो संविधान दिनालाच विधी असेही म्हणतात असे त्यांनी स्पष्ट केले . कारण जेव्हा संविधान तयार झाले संविधानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता तसेच आपले मूलभूत अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या या बहाल करण्यात आल्या आणि म्हणून आपण आपली कर्तव्य जबाबदाऱ्या कशा रीतीने पार पाडल्या पाहिजेत याची आठवण करून देण्यासाठी जणू हा दिवस साजरा केला जातो . असे मत त्यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेब प्राध्यापक सुवर्ण अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेब प्राध्यापक निधी शर्मा यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ . अनिता वानखेडे , डॉ .प्रतिभा पाटील , डॉ . अनिता जावे , डॉ . जयश्री पाटील , प्रा. सुवर्णा अहिरे , निधी शर्मा ,जयश्री शिंगाडे , श्री पंकज वाघ , श्री अरविंद पवार , श्री चंद्रकांत सपकाळे व प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button