जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे मराठी राजभाषा वक्तृत्व स्पर्धा उत्साहात 

जळगाव : संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त संवाद कौशल्य व आत्मविश्वास विकास अभियानांतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मुकेश नाईक होते. त्यांनी मार्गदर्शन करताना मराठी ही आपल्या संस्कृतीची ओळख असून दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने वापर करावा, असे आवाहन केले. पर्यवेक्षिका शितल कोळी यांनी स्पर्धेचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा, आधुनिक काळातील आवश्यकता तसेच सोशल मीडियामध्ये मराठीचा वाढता वापर यावर विविध मुद्दे मांडले. काही विद्यार्थ्यांनी काव्यपंक्ती व घोषवाक्यांच्या माध्यमातून मराठीप्रेम व्यक्त केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट वक्त्यांना त्यांच्या वर्ग शिक्षकांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच केले. संपूर्ण कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव व अभिमानाची भावना अनुभवायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button