
जळगाव, दि. १४ एप्रिल २०२६ : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी नगरसेवक श्री. अशोकभाऊ लाडवंजारी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालाल वंजारी, संचालक श्री. वासुदेवभाऊ सानप, भगवान लाडवंजारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी, तसेच श्रीराम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे मॅडम व शिक्षिका राजश्री तायडे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदनाने करण्यात आली. यावेळी इयत्ता १ ली ते ९ वीतील विद्यार्थ्यांनी आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संविधान निर्मितीतील योगदानाविषयी माहिती सादर केली. यात गौरी पवार, वैष्णवी सिद्धार्थ, नंदिनी पवार, ओम पवार, भावना शेजवळ, मोहिनी शिवदे व खुशी माळी या विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
तसेच आलिया पिंजारी, कल्याणी कोचुरे, वैष्णवी सिद्धार्थ व सहकारी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
प्रमुख अतिथी राजश्री तायडे मॅडम यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा व विचारांचा ऊहापोह केला. अध्यक्षीय भाषणात श्री. अशोकभाऊ लाडवंजारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समाजसुधारक कार्याचा व भारतीय राज्यघटनेतील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” हा संदेश दिला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अमित तडवी सर व उपसांस्कृतिक प्रमुख सरस्वती पाटील मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन आलिया पिंजारी (इयत्ता नववी) हिने तर आभार प्रदर्शन कल्याणी कोचुरे (इयत्ता नववी) हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





