क्रिडाजळगाव

डॉ भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

पुणे अंतिम विजेता मुंबई उपविजेता तर ठाणे तृतीय व कोल्हापूर चौथ्या स्थानी

जळगाव –  पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनाच्या संजीवन दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. अंतिम सामना मुंबई विरुद्ध पुणे यांच्यात झाला खेळ संपण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी पुणे संघाची इशिता देबनाथ यांनी गोल केला त्या गोलच्या आधारावर पुणे संघाने मुंबई संघावर १-० ने विजय संपादन केला. तृतीय स्थानासाठी कोल्हापूर विरुद्ध ठाणे यांच्यात अटा-तटीचा सामना झाला सामन्याच्या २७ मिनिटात ठाण्याची नेसा बोंद्रे हिने उत्कृष्ट गोल करून ठाणे संघाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे ठाणे तृतीय तर कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर राहिला.

पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी आमदार सौ मधु जैन, जैन इरिगेशनचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, गोदावरी फाउंडेशनचे डॉ अनिकेत पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील प्रशिक्षिका चंचल माळी, पिंच बॉटलिंग चे जफर शेख , जिल्हा फुटबॉल संघटनेचे फारुक शेख , डॉक्टर अनिता कोल्हे, एडवोकेट आमिर शेख, अब्दुल मोहसीन, ताहेर शेख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अंतिम सामन्याच्या नाणेफेक व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी क्रीडा संकुल आला येऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेच्या नाणेफेक केले त्यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीच्या पत्रकार राजश्री चौधरी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक संघटने चे फारुक शेख व डॉ अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती.

कोल्हापूर विरुद्ध ठाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोल्हापूरची संस्कृती शिंगोटे तर अंतिम सामन्यातील मुंबईची अनुष्का मोहिते हिने पटकाविला. संपूर्ण स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडू पुण्याची शर्वरी माने, बेस्ट स्कोरर मुंबईची प्रीशा विराल, बेस्ट गोलकीपर कोल्हापूरची आशावरी पाटील, बेस्ट डिफेंडर ठाण्याची न्यासा बोंद्रे. स्पर्धेतील विजयी उपविजयी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावलेले पुणे, मुंबई , ठाणे व कोल्हापूर या संघातील खेळाडूंना सुवर्ण, रजत व ब्रांझ पदक सहित ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडूंना सुद्धा वैयक्तिक ट्रॉफी, पदक व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले. खेळाडूंना डॉ अनिकेत पाटील व सौ मधु जैन यांनी अत्यंत सुरेख अशा शब्दात भावी आयुष्यासाठी खेळ व क्रीडांगण याचे महत्त्व विशद करून स्वतःचे अनुभव कथन केले व शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वितरण समारंभाचे समारोपिय प्रस्तावना जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी तर सूत्रसंचालन सरिता खाचणे व आभार प्रा.डॉ. अनिता कोल्हे यांनी मानले.

फोटो कॅप्शन

१) विजयी व उप विजयी संघा सोबत उभे असलेले डावी कडून रोहिणी सोनवणे, हिमाली बोरोले, अब्दुल मोहसीन, फारुक शेख, अनिल जोशी, जफर शेख, डॉक्टर अनिकेत पाटील, मधु जैन , चंचल माली , प्रा डॉ. अनिता कोल्हे,राजेंद्र सावंत, आमिर शेख, प्रतीक्षा देवाग, एनी पॉल, ताहेर शेख, गुरू प्रसाद, छाया बोरसे, आदि दिसत आहे.

२) स्पर्धेचे नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, फारुक शेख, राजश्री चौधरी आदी दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button