जळगावआरोग्य

नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नशिराबाद : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलिओ बूथवर ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमान यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

नशिराबाद टोल नाका येथे आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, दीपक किसन तायडे, संदेश सुनील महाजन तसेच समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) शोएब पटेल यांच्या पथकाने टोल नाक्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा आदी वाहनांमधील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले.

यावेळी पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रत्येक बालक पोलिओमुक्त राहण्यासाठी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देणे आवश्यक असल्याचे सांगत, ज्या पालकांना आज बूथवर येणे शक्य झाले नाही त्यांनी पुढील तीन दिवस आरोग्य विभागाच्या पथकाकडून होणाऱ्या गृहभेटीदरम्यान आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य पाजून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नशिराबाद परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सक्रिय सहभाग नोंदविल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button