राज्यसामाजिक

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणकरांना लाभले ह.भ.प. मंगेशजी जोशी महाराजांचे आशीर्वाद

जळगाव : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीराम मंदिर संस्थान, जुने जळगाव यांच्या वतीने आयोजित श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा जळगाव ते पंढरपूर व पंढरपूर ते जळगाव असा सुमारे ५४ दिवसांचा आणि ११०० किलोमीटरचा पदयात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे. परमपूज्य गादीपती ह.भ.प. मंगेशजी जोशी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३०० वारकरी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

वारीदरम्यान कंदर येथे मेहरूण चे माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक, सुनील वंजारी, नामदेव नाईक आणि विलास घुगे यांनी ह.भ.प. मंगेशजी जोशी महाराजांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराजांनी सर्वांची प्रेमपूर्वक विचारपूस करून आशीर्वाद दिला. तसेच वारकरी संप्रदायातील भक्ती, सेवा, सदाचार आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. उपस्थितांनीही महाराजांशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांच्या विचारांचा लाभ घेतला.

या प्रसंगी मेहरूनच्या ग्रामस्थांना पूज्य महाराजांचे दर्शन व आशीर्वाद लाभल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले. श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना करत ह.भ.प. मंगेशजी जोशी महाराज यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेची सेवा अधिकाधिक वृद्धिंगत होत राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button