
जळगाव, दि. ९ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र स्टेट वेटरन्स ऑक्वेटिक्स असोसिएशन व जळगाव जिल्हा प्रौढ ऑक्वेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने लक्ष्मी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने २७ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा जळगाव येथे दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाच्या अनुषंगाने रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी नियोजन बैठक घेण्यात आली.
बैठकीत आगामी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धकांसाठी निवास व भोजन व्यवस्था, स्विमिंग पूलची परवानगी, निधीची उपलब्धता, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची निवड, तसेच प्रसिद्धी व मीडिया व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्टेट वेटरन्स ऑक्वेटिक्स असोसिएशनचे संस्थापक डॉ. अरविंद शिरभाते (अमरावती) होते. यावेळी अध्यक्ष अरुण सावंत (कोल्हापूर), पदाधिकारी प्रा. सतीश दवंडे, अरुण किनगावकर, प्रकाश ठाकरे, शंकर वानखेडे तसेच जळगाव जिल्हा प्रौढ ऑक्वेटिक्स असोसिएशनचे सेक्रेटरी संजय चौधरी उपस्थित होते.
याशिवाय कमल किशोर मणियार, संदीप महाजन, दिगंबर मुकुंदे, निर्मल अरोरा, रमेश शर्मा, सतीश लुंकड, जसपाल अरोडा, गणेश सोनार, ज्ञानेश्वर देशमुख, प्रिया चौधरी, अविनाश वाकलकर, समीर पाटील, कुणाल विसपुते, आकाश सोनवणे, सिद्धार्थ मोरे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जळगावात होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील प्रौढ जलतरणपटू सहभागी होण्याची अपेक्षा असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे.






