जळगावशैक्षणिक

नाहाटा महाविद्यालयात अँटी रॅगिंग संबंधित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

भुसावळ – नाहाटा महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती, SHe Box आणि भुसावळ तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग मार्गदर्शन पर व्याख्यान चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. जी. आर. वाणी, प्रमुख वक्ते ॲड. प्रिया अडकमोल, पत्रकार उज्वला बागुल (PLV) तसेच त्यांचे सहकारी सौ. रूपाली नेवे व सौ. नेहा जावरे, युवती कल्याण समिती प्रमुख प्रोफेसर डॉ. गौरी पाटील, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील, SHe बॉक्स – अंतर्गत तक्रार समिती प्रमुख प्रा. डॉ. स्वाती फालक उपस्थित होते. उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रोफेसर डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उदघाट्न करताना मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफेसर डॉ. गौरी पाटील यांनी केले.

उज्वला बागुल यांनी विधी सेवा विषयक प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली. आणि यासंदर्भात अनेक शिबिरे तसेच उपक्रम जिल्हा आणि गाव स्तरावर राबवण्यात येतात अशी माहिती दिली.

प्रमुख वक्ता ॲड. प्रिया अडकमोल यांनी अँटी रॅगिंग संदर्भात माहिती देताना रॅगिंग सहन करणे हा सुद्धा एक गुन्हा आहे असे प्रतिपादन केले. रॅगिंग ही सीनियर होण्याची परंपरा नाही असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगताना त्याचे होणारे दुष्परिणाम तसेच रॅगिंग घेणारे आणि त्याचे यांच्या मानसिक आरोग्यावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर होणारे दुष्परिणाम सुद्धा त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून दुसऱ्यांना आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी वर्तणूक ठेवावी हे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पूनम महाजन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ममता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन साठी समिती सदस्य प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, डॉ. निलीमा पाटील, प्रा. डॉ. संगीता भिरुड, प्रा. डॉ. पूनम महाजन, प्रा. अर्चना भालेराव, प्रा. प्रणिता राणे, प्रा. स्वाती शेळके, प्रा. स्मिता बेंडाळे, सौ. प्राजक्ता बागुल, श्रीमती शरयू भोळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button