

जळगाव – जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगर येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उर्फ सतीश मिलिंद गायकवाड यांची मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीच्या जळगाव शहर अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाठीया यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हयाचे निरीक्षक डॉ विजय बापू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सदर नियुक्ती करण्यात आली.
सतीश गायकवाड परिवर्तन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असुन जळगाव महानगर डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळालेला आहे. परिवर्तन ग्रुपच्यामाध्यमातून ते नेहमीच समाजहिताचे कार्य करीत असतात आणि बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उचलून मोर्चे, आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत असतात. त्यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची उचित दखल घेत मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीच्या जळगाव शहर अध्यक्ष या पदावर सतीश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल समाजातील विविध घटकांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे.




