जळगावशैक्षणिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेखक -विद्यार्थी परिसंवाद कार्यक्रम

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आज लेखक- विद्यार्थी परिसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .”वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत वृत्तपत्राचे उपसंपादक श्री रामदास माळी हे उपस्थित होते.त्यांनी वृत्तपत्राचे वाचन कसे करावे तसेच वृत्तपत्रातील अग्रलेख का वाचावे ?तसेच पुस्तकाचे वाचन कसे करावे ?याविषयी माहिती दिली तसेच श्री पाटील यांनी वृत्तपत्राचे महत्त्व स्पष्ट केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅडम या होत्या .त्यांनी शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत असल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांचे वाचन वाढवावे व आपल्या व्यक्तिमत्वात भर पाडावा याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्या.सुवर्णा अहिरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री पंकज वाघ यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नारायण खडके यांचे तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील डॉ.अनिता वानखेडे, डॉ.प्रतिभा पाटील, डॉ.अनिता जावे ,डॉ.जयश्री पाटील, सहा.प्राध्या.सुवर्णा अहिरे, सहा.प्राध्या.निधी शर्मा ,प्राध्या.जयश्री शिंगाडे ,तसेच ग्रंथपाल श्री पंकज वाघ, श्री अरविंद पवार ,श्री चंद्रकांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button