जळगावराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध मागण्या व आरोप करण्यात आले.     आंदोलनकर्त्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या हनी ट्रॅप प्रकरणात नार्को टेस्ट व्हावी, लोढा यांच्या “बटन दाबल्यावर देशभरात तहेलका माजेल” या वक्तव्याची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात असताना जामनेरचे आमदार द्वेषपूर्ण राजकारणात गुंतल्याचा आरोप केला. हनी ट्रॅप प्रकरणातील दबावामुळे जामनेरच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन घडवून आणले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वीज कनेक्शन यांसारख्या प्रश्नांवर मात्र मंत्री महाजन मौन बाळगत असल्याचा निषेध आंदोलनात व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान विविध आशयाचे बॅनर्स दाखवण्यात आले व घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात अशोक लाडवंजारी, रामदास पाटील, सुनील माळी, राजू माळी, गणेश पाटील, किशोर गायकवाड, बबलू सापदारे, किरण राजपूत, नईम खाटिक, नंदू हीरोळे, बापू ससाणे, डॉ. अभिषेक ठाकूर, संदीप जावळे, प्रशांत भालशंकर, संजय कोळी, जाफर शेख, सतीश पाटील, प्रदीप बडगुजर, अजय पाटील, जगदीश कोळी, अमित वाणी, रोहन महाजन, राजू मोरे, इब्राहिम तडवी, आकाश हिवाळे, चेतन पवार, एजाज खान, भला तडवी, समाधान वाघ, संतोष मोरे, गणेश पाटील, रफिक पटेल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button