जळगावसामाजिक

श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – दरवर्षीप्रमाणे यंदा देखील श्री विश्वकर्मा युवा फाऊंडेशन, जळगांव यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री विश्वकर्मा यांची जयंती जळगांव शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० ते १.०० वाजेपर्यंत श्री विश्वकर्मा मिरवणूकीचे आयोजन करण्यात आहे. सकाळी ८.३० वाजता चिमुकले राम मंदिर येथे रथ पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती करण्यात येईल व त्यानंतर अतिथी व समाजातील मान्यवरांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे व शेवटी दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन ठेवलेले आहे.

तद्नंतर हतनूर वसाहत हॉल महाबळ, जळगाव या ठिकाणी शासनांच्या विविध योजनांची माहिती व दिव्य स्पर्श चिकित्सा आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व समाज बांधवांनी या मिरवणूक व सर्व कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button