शैक्षणिकजळगाव

हर्षल कोतवाल यांना पीएचडी पदवी प्रदान

हर्षल राजस कोतवाल यांना पीएचडी पदवी प्रदान

जळगाव : डॉ. हर्षल राजस कोतवाल यांना २४ जानेवारी २०२५ रोजी कॉम्प्युटर इंजिनीअरींग या विषयात मुल्यांकन परिक्षेतील यशस्वी निष्कर्षानंतर कवियत्री बहिणाबाई चौधरी उमवि विद्यापीठ तर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

SSBT महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गिरीष कुमार पटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हर्षल कोतवाल यांनी ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ या विषयावर प्रबंध सादर केला. या क्षेत्रातील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा उपयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्स व भाषा प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये होणार आहे.

कवीयत्री बहिणाबाई चौधरी उमवि जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रा. वि. एल. माहेश्वरी व प्रो. एस. टी. इंगळे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात डॉ. हर्षल कोतवाल यांना त्यांचे पीएचडी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्रमुख अधिकारी, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यासोबतच, डॉ. हर्षल कोतवाल यांच्या कुटुंबीयांमध्ये उदय पाटील, राजस कोतवाल आणि तेजस देपुरा यांची उपस्थिती देखील उल्लेखनीय होती.

डॉ. हर्षल कोतवाल यांचे प्रबंध ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ या विषयावर आधारित होते, जे विदयार्थी आणि संशोधकांसाठी एक अत्यंत प्रगल्भ व महत्वाचे योगदान ठरेल. त्यांचे हे यश शालेय व शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

डॉ. हर्षल कोतवाल यांना त्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button