

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी एरंडोल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ…!
प्रतिनिधी एरंडोल – २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी येथे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली.
मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी विनोदकुमार पाटील यांनी मानवी साखळी, रांगोळ्या व कर्मचाऱ्यांची मोटारसायकल रॅली इत्यादी उपक्रमांचे नियोजन केले.यावेळी नगरपालिका विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.




