

जळगाव – आज जागतिक वसुंधरा दिवस असून त्या निमित्त वृक्ष, जल संवर्धन पत्रकाचे विशेष प्रकाशन नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्री.आयुषजी प्रसाद यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
सध्या तप्त उन्हाळा ,बदलते वातावरण गंभीर होत असून प्रत्येक व्यक्ती, परिवार, सामाजिक सेवाभावी संस्था,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रहितार्थ जल व वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे.
वसुंधरा आनंदी तर सजीव सृष्टी सुखी राहील.आज आपण एक संकल्प घेऊन आवडत्या व्यक्तीची आठवण म्हणून तरी प्रत्येकाने एक वृक्ष जगवा त्यास आपले नाव द्या पण हे मंगल कार्य करा.असे आवाहन मुक्ती फाउंडेशन तर्फे मुकुंद गोसावी यांनी केले आहे.




