जळगावप्रशासकीय

दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात महत्त्वाची नेमणूक; हर्षाली चौधरी यांची राज्य सल्लागार मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

जळगाव : रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन अंतर्गत संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या संस्थापक हर्षाली चौधरी यांची महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई मार्फत राज्य सल्लागार मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आली असून त्या थेट राज्याचे मुख्यमंत्री यांना अहवाल सादर करण्यास अधिकृत असतील.

नवीन जबाबदारीनुसार, हर्षाली चौधरी यांना दिव्यांग व्यक्तींकरिता केंद्र शासनाच्या विविध योजना व ‘नमो दिव्यांग शक्ती अभियान’ अंतर्गत सेवा-सुविधा, थेरपी, सर्वेक्षण, समुपदेशन, जनजागृती, त्वरित निदान व शीघ्र हस्तक्षेप शिबिरांचे आयोजन, सहाय्यक साधनांची उपलब्धता तसेच सर्जिकल सेवा व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

हर्षाली चौधरी यांचे दिव्यांग व्यक्तींसाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आणि प्रेरणादायी असून, त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे असंख्य गरजूंना नवजीवन मिळाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल  मित्रपरिवार व समाजातील सर्वच स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button