
जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महोत्सव समिती २०२६ च्या वतीने आयोजित महिलांची भव्य बाईक रॅली शनिवारी (दि. ११ एप्रिल) उत्साहात पार पडली.
रॅलीचा शुभारंभ काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आला. यावेळी भारती रंधे व संध्या तायडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या रॅलीमध्ये निलू इंगळे, आशा अंभोरे, लक्ष्मी कुमावत, प्रतिभा घोडेस्वार, काजल वाघ, आशा मौर्य, कविता सपकाळे यांच्यासह अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रखर उन्हाची तमा न बाळगता सर्व भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
रॅलीदरम्यान महिलांनी घोषणांचा जोरदार वर्षाव करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पुढे महात्मा फुले मार्केट येथे महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
ही रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत महिलांच्या सहभागातून सामाजिक ऐक्य व जागृतीचा संदेश देत यशस्वीरीत्या संपन्न झाली.






