
जळगाव : महाराष्ट्र ड्रॅगन बोर्ड व ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ साठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा ड्रॅगन बोर्ड व ट्रॅडिशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन, जळगाव यांच्या वतीने ही जिल्हास्तरीय संघ निवड चाचणी १३ ऑगस्ट २०२६ रोजी मेहरुण तलाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार असून, जिल्ह्यातील ड्रॅगन बोट खेळातील इच्छुक व पात्र खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.
निवड चाचणीसंदर्भातील अधिक माहितीसाठी संजय चौधरी यांच्याशी ९४२०३९०३३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.






