जळगावशैक्षणिक

प्राथमिक विद्या मंदीर शाळा, पिंपळगांव बु. येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

भुसावळ – तालुक्यातील प्राथमिक विद्या मंदीर, पिंपळगांव बुदुक येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभकतीच्या वातावरणात साजरा करण्यात आला .यावेळी ध्वजारोहण कार्यक्रम शालेय सामिती उपध्यक्ष सौ . उषाताई विलास सोनवने यांच्या हस्ते पार पडला. सामूहिक राष्ट्रगीत गायनानंतर परिसरात देशभक्तीपर घोषणांनी व गीतांनी वातावरण भरवून गेले. कार्यक्रमांस ग्रामपंचायत सरपंच , ज्ञानदेव धनसिंग मावळे, ग्रामपंचायत अधिकारी जगदीश इंगळे, प्रकाश पाटील सदस्य , तसेच समाजिक कार्यकर्ते प्रमोद सरोदे व , ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थिनी सादर केलेल्या देशभक्तीपर कार्यक्रमांला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ध्वजारोहणाची संधी आदिवासी समाजाच्या शालेय समिती उपाध्यक्ष यांना दिल्याबद्दल आयोजकाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले . 26 जानेवारी औचित्य साधून शाळेच्या समोरील भागामध्ये ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी जगदीश इंगळे , व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पडला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button