जळगावशैक्षणिक

आव्हाणे येथील उर्दू शाळेत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आव्हाणे : जि. प. उर्दू शाळा, आव्हाणे येथील विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. या शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शाळेतील सुमारे १५० विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बसद्वारे श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, चिंचोली येथे नेण्यात आले. याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदोष आढळून येतील, त्यांना संस्थेमार्फत मोफत चष्मा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी नेत्र तपासणी केली. तसेच होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. सिद्धेश्वर पाटील, नर्सिंग स्टाफ व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अशपाक तसब्बर सर व इतर शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दरम्यान, गट शिक्षणाधिकारी जळगाव अजित तडवी यांनी तालुक्यातील सर्व शाळांनी अशा उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले असून, या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button