जळगावसामाजिक

होळी-धुलीवंदनात मेहरुणमध्ये फुलला हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा रंग

जळगाव ( १४ मार्च ) – यंदा प्रथमच रमजान महिन्यात होळी व धुलीवंदन सण देखील आल्याने जळगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने मेहरूण येथील महादेव मंदिर परिसर, तांबापुरा तसेच संपूर्ण हद्दीत ‘एकता होळी धुलीवंदन’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विविध जाती-धर्मांमध्ये बंधुभाव वाढवणे आणि समाजात शांतता टिकवणे हा होता.

या प्रसंगी हिंदू, मुस्लिम तसेच सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन रंगांची उधळण केली, एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या आणि मिठाई भरवून आनंद साजरा करून सद्भावना जपली. या माध्यमातून समाजातील तरुणांमध्ये ऐक्य आणि सलोखा वाढीस लागला. तसेच समाजात बंधुत्वाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश देण्यास मदत झाली असून, विविध समाजातील बांधवांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करावेत, असा संदेशही यातून देण्यात आला.

या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, असे सामाजिक ऐक्य वाढवणारे उपक्रम भविष्यातही आयोजित व्हावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील,  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, अनिल वाघ, माधुरी बोरसे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, राहुल तायडे, संजय पाटील, तसेच माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, प्रशांत नाईक, इकबाल पिरजादे, शिवसेनेच्या महिला महानगर अध्यक्ष शोभा चौधरी, वसीम बापू, आसिफ शेख, जाकिर बागवान, आसिफ शाह, दिलीप लाडवंजारी, भागवत पाटील, देवेंद्र नाईक, तेजस वाघ, देवेंद्र वंजारी, रितेश लाडवंजारी, योगेश नाईक, दिनेश घुगे, किशोर वाघ, योगेश लाडवंजारी, राहुल सानप, हेमंत नाईक, भिकन सानप, ईश्वर पाटील, गजानन चाटे, सागर लाड, किरण नाईक, वैभव वाघ, विजय देशमुख, गजानन वंजारी, इसा व्यापारी, इरफान बागवान, कल्लू खाटीक, इम्रान बागवान, अजीज बाबा, मुस्ताक बिजली, जब्बार भाई, मुश्ताक पटेल, नदीम शेख यांच्यासह  मेहरूण परिसरातील नागरिक  प्रमाणात उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button