जळगावप्रशासकीय

राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली

जळगाव दि. 23 मार्च – जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित व दाखलपूर्व मिळून एकूण ११,०८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ३१,५५,७६,९३९/- रुपयांची वसुली करण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये ९,२७६ दाखलपूर्व आणि १,८०५ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच १९ ते २१ मार्च दरम्यान झालेल्या विशेष मोहिमेत आणखी ६८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.  एस. एन. राजुरकर, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश-१ जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत यशस्वी झाली. सर्व न्यायाधीश, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांच्या सहकार्याने या उपक्रमाला मोठे यश लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button